जया काबरा यांचा दिल्ली येथे सन्मान, कौतुकाचा वर्षाव

जया काबरा यांचा दिल्ली येथे सन्मान, कौतुकाचा वर्षाव

उदगीर (एल. पी. उगीले) : नवी दिल्ली येथील लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती या संस्थेच्या वतीने देशभरातील 101 कर्तबगार महिलांचा “सावित्रीच्या लेकी” या मानाच्या पुरस्काराने केंद्रीय राज्यमंत्री ना भागवत कराड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या 101 कर्तबगार महिलांमध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील जया काबरा या समाजसेविकेचाही समावेश होता. त्यांचाही सन्मान राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी आयोजक संस्थेचे अध्यक्ष सौ. प्रतिभा सोळसे, महासचिव विक्रम सोळसे, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष विनोद जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या जया काबरा या समाजसेविका तर आहेतच आहेत, सोबतच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्या धाडसाने राजकारणामध्ये कार्यरत आहेत. अशा कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन कार्य करण्यासाठी नवी ऊर्जा देण्याची गरज आहे. असे विचारही राज्यमंत्री ना. भागवत कराड यांनी व्यक्त केले. तसेच महिलांनी आर्थिक स्वावलंबनासाठी देखील प्रयत्न करावेत, उद्योग धंदे उभा करावेत. त्यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी आहे. स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या पातळीवरून महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन केले.

जया काबरा यांचा दिल्ली येथे सन्मान, कौतुकाचा वर्षाव

याप्रसंगी हरियाणाचे उद्योगपती कुलविंदर सिंग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. जया काबरा यांचा दिल्ली येथे सत्कार झाल्यानंतर उदगीरचे आमदार तथा माजी राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महिला मोर्चा प्रदेश सदस्य उत्तराताई कलबुर्गे, सरोजा वारकरे, मधुमती कनशेट्टे, मंदाकिनी जीवने, अनिता बिराजदार, स्वाती वट्टमवार, बबीता पांढरे, भारती सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

काबरा यांचा सत्कार भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातही माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, बापूराव येलमटे मामा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील कर्तबगार महिलेला हा बहुमान मिळाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य रमेशआप्पा कराड यांनीही सत्कार केला. याप्रसंगी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, प्रेरणा होनराव, ज्ञानेश्वर चेवले, महेश पाटील, भागवत कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकरजी शृंगारे यांनी देखील जया काबरा यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उदगीर येथील एका कर्तबगार महिलेला मिळालेला हा बहुमान निश्चितच संपूर्ण उदगीरकरांचा गौरव करणार आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही.

About The Author