आखेर पोलीस फ्लॅश न्युज च्या रेट्यामुळे जि. प. कन्या प्रशालेत तांदूळ पुरवठा करण्यात आला

आखेर पोलीस फ्लॅश न्युज च्या रेट्यामुळे जि. प. कन्या प्रशालेत तांदूळ पुरवठा करण्यात आला

पोलीस फ्लॅश न्यूज इफेक्ट

वाढवणा बुद्रुक (हुकूमत शेख) : येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत नवीन वर्ष सुरु होऊन पंधरवाडा उलटला तरी कन्या शाळेत दुपारी दिला जाणारा पोषण आहार (खिचडी ) संबंधित प्रशासनाने पंधरा दिवस उलटून गेले तरी, शाळेत तांदूळ पुरवठा केला नसल्यामुळे पहीली ते आठवी पर्यंतच्या 300 विध्यार्थिनींना दुपारच्या जेवणा अभावी उपाशीच ज्ञानार्जन करावे लागत होते. आमचे वाढवणा प्रतिनिधी हुकूमत शेख यांना कन्या शाळेत पंधरा दिवसा पासुन शाळेत दुपारची खिचडी शिजत नाही, पंचायत समिती गट संसाधन केंद्र यांनी अर्थात प्रशासनाने तांदुळ पुरवठा केला नाही. व शाळेतील तांदुळ संपले, तांदूळ संपल्यामुळे खिचडी शिजने बंद झाल्याची माहिती खात्री पुर्वक मिळताच त्यांनी दिनांक 16 जानेवारी सोमवार रोजी “पोलीस फ्लॅश न्यूज” वर्तपत्रात वाढवणा जिल्हा परिषद शाळेत “नवीन वर्ष सुरु झाल्या पासुन पोषण अहार गायब” या मथळ्या खाली बातमी प्रसिद्ध करताच, झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला खळबडून जाग आली. व दि.17 जानेवारी मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता वाढवणा कन्या प्रशालेत तांदुळचा ट्रक आला. तांदूळचा ट्रक आलेला पाहताच मुलींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मुख्याध्यापक एम. ए. शेख व शिक्षक अंगद कज्जेवाड तसेच सेवक केसगिरे यांनी तांदुळाचे पोते मोजून शाळेतील खोलीत ठेवण्यात आले. समाजहिताची बातमी प्रसिद्ध करून शाळेतील 300 विध्यार्थीनीच्या जिव्हाळ्याचा पोषण अहाराची (भोजनाची) बातमी प्रसिद्ध करून प्रशासनास तांदूळ पुरवठा करण्यास भाग पाडुन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न “पोलीस फ्लॅश न्युज”वृत्तपत्रातून केल्या मुळे संपादक व कार्यकारी संपदाक निर्भीड सडेतोड लेखणीतुन न्याय मिळवून देणारे गणेश होळे, एल. पी. उगिले , वार्ताहर हुकूमत शेख यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला म्हणून पोलीस फ्लॅश न्यूज वृत्तपत्राचे सर्व विध्यार्थिनी, पालक, वाचक वर्गातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

About The Author