मराठवाडा विद्यापीठ नामविस्तारांचा लढा हा सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी होता – प्रा बालाजी आचार्य
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर मराठवाड्याच्या मातीतील ऐतिहासीक दिवस १४ जानेवारी मानला जात असून या दिवशी औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्यात आले आणि सलग १७ वर्ष भीम सैनिक अनुयायानी दिलेल्या संघर्ष लढयाला यश प्राप्त झालं हा नामांतराचा लढा स्वातंत्र्य , बधुत्व आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी होता असे प्रतिपादन प्रा बालाजी आचार्य यांनी अहमदपूर येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजीत मकर संक्रात, नामविस्तार दिन, आणि सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यान कार्यक्रमात केले.
या विविध कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे , उद्घघाटक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी क्रॉंग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, प्रमुख मार्गर्शक प्रा बालाजी आचार्य प्रमुख पाहुणे सामाजिक नेते हुसेनभाई मनियार , युवा नेते अशोक सोनकांबळे, पञकार मेघराज गायकवाड, धम्म उपासक शेषेराव ससाने , डॉ संजय वाघंबर, शाहुताई कांबळे, वसंतराव आचार्य ,भिम शाहिर सुभाष साबळे आदिसह संयोजक रिपाईचे तालुका अध्यक्ष अरुणभाऊ वाघंबर , अंजली वाघंबर अथक परिश्रम घेत उपस्थित होते यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रस्ताविक संयोजक अरुणभाऊ वाघंबर यानी केले. गेल्या 35 वर्षापासून कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमात प्रतिवर्षाप्रमाणे मक्रर संक्राती निमित्य 370 गरजू महिलांना कपडे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी पुढे बोलताना प्रा आचार्य म्हणाले की,मकर संक्रांत महाराष्ट्रातील महिलांच्या आवडीचा सण असून यादिवशी महिला नवीन कपडे परिधान करून आपल्या कुटुंबासाठी सुख संपत्ती ची याचना करतात हा जानेवारी महिना ऐतिहासिकदृष्ट्या सण ,जंयती , उत्सव आणि महापराक्रमाचा आहे १ जानेवारी शौर्य दिन ३ जानेवारी क्रांती ज्योती साविञीमाई फुले चा जन्मदिन आपण महिला मुक्तीदिन म्हणून साजरा करतो तर,१२ जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती दिन, युवक दिन आणि १४ जानेवारी ऐतिहासीक नामविस्तार दिन आनंदाने साजरा केला जातो या दिवशी सर्वाचे ऊर्जा स्रोत, स्वाभिमान , अभिमान , उध्दारकर्ते ज्यानी शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मराठवाडयात उच्च शिक्षणाची पायाभरणी औरंगाबाद ला मिलींद महाविद्यालयाच्या रुपाने केली त्या महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावे याकरिता सातत्याने सतरा वर्ष लढा देणारे लाखो भीमसैनिक युवक , युवती, जातीवाद्यांच्या व पोलीस अत्याचारांमध्ये शहीद झाले पोचीराम कांबळे सह १३ जनानी प्राणांची आहुती दिली असंख्य घराची राख रांगोळी झाली कशासाठी तर केवळ बाबासाहेबाच्या नावासाठी अस्मितेसाठी , मुक्तीदात्याच्या कृतज्ञतेपोटी आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी होता ही जाणीव मराठवाड्यातील जनतेला व्हावी असे ही मत मांडले यावेळी उदघाटनपर मनोगत शिवानंद हेंगणे यांनी व्यक्त केले तर अध्यक्षीय समायोचित मनोगत गोपीनाथ जोंधळे यांनी मांडले तदनंतर वाघंबर परिवाराच्या वतीने भोजनदान देण्यात आले आणि नंतर राञभर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमशाहीर श्रीरंग गायकवाड, भीमकन्या अनिता कांबळे किनगांवकर यांच्या बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला या विविध कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी आयु अंजली वाघंबर, आदित्य वाघबर, शुभम वाघंबर, सुहास गायकवाड, आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी केली तर आभार अशोक सोनकांबळे यांनी सर्वांची मानले.