वाढवण्यात मासळी बाजार बहरला अनेक तरुणांना मिळाला रोजगार

वाढवण्यात मासळी बाजार बहरला अनेक तरुणांना मिळाला रोजगार

हुकूमत शेख/ वाढवणा (बु.) : वाढवणा बु. येथील आठवडी बाजारात भाजी पाला, कपडे,मिठाई, कटलरी, चपला, फ्रुट बनाना, सफरचंद, अंगुर, बिट, पेरू, तसेच मसाले, व मासळीचे दुकान थाटले असुन अगदी जवळच असलेल्या डांगेवाडी तलावातून मासळी पकडून अनेक बेरोजगार तरुण मासळी विकून आपली उपजीविका भागवीत आहेत. तलावात अनेक प्रकारची चिलापी, बडव, वामट, सुपर, कतला, राहु, मरळ, खेकडे, अशा प्रकारची मासळी तलावात आहेत. तेच बेरोजगार युवक पप्पू डुबुकवाड, इसानंबर डुबुकवाड, गणेश अमृतवाड, राम डुबुकवाड, संतोष वंदनवाड हे बेरोजगार युवक जवळच तलाव असल्यामुळे ताजी मासळी आणुन स्वस्त दरात विक्री करत आहेत. सर्वात स्वस्त चिलापी मासळी प्रति एक किलो 60,रुपये, वामट, मरळ 200 रुपये किलो, सुपर,कत्ला, राहु 100 रुपये किलो, स्वस्त दरात सर्वांना परवडेल अशा दराने ताजी मासळी विक्री करत असल्यामुळे परिसरातील सर्व मासळी शौकीन ग्राहक आठवडी बाजारात स्वस्त मिळत असल्यामुळे ताजी मासळी स्वस्त दरात घेउन जाताना दिसत आहेत. या मासळी बाजारात कमीत कमी एक ते दिड क्विंटल मासळी विक्री होत असल्याची माहिती पप्पु, राम डुबुकवाड यांनी दिली. या बाजारामुळे आठ ते दहा कुटूंबाना रोजगार मिळत असुन फक्त आम्हाला जागा अपुरी पडत असुन आम्हाला चांगली जागा पंचायतने दिल्यास आम्हाला बरे होईल. अशी माहिती आमचे प्रतिनिधी हुकूमत शेख यांना पप्पु व संतोष वंदनवाड याने दिली. एवढे मात्र नक्की आम्हाला या तलावामुळे व बाजारामुळे जवळच ग्राहक मिळत असल्यामुळे आमच्या रोजी रोटीचा प्रश्न तूर्तास मिटला, मात्र ग्रामपंचायत ने जागा जर करून दिली तर अजुन बाहेरून देखील व्यापारी येतील, व मासळी बाजार वाढेल. या बाजारामुळे युवकांना रोजगार मिळाला व बाजार बहरला.

About The Author