टाकळी येथे “चला जाणू या नदीला” उपक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न
देवणी /रणदिवे लक्ष्मण
देवणी तालुक्यातील टाकळी येथे “चला जाणू या नदिला” अभियानांतर्गत मांजरा नदीसंवाद करणारी मंडळी टाकळी या गावी आली. सर्वप्रथम गावकरी व शालेय विद्यार्थी व सरपंच, बचत गट महिला व शेतकरी गट, गावातील पतसंस्था यांनी मानवलोक विकास संस्था अंबाजोगाई,लातूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत केले. तसेच कलशाचे पूजन करून ही रॅली गावामध्ये काढण्यात आली. यानंतर भजन कीर्तन करीत पुढे राष्ट्रीय विद्यालय, यानंतर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शायरी ने बालकांनी मंत्रमुग्ध केले. यानंतर देवणी तालुक्याचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी भाषण केले व नंतर “चला जाणू या नदीला”या उपक्रमाचे सहसमन्वयक बाळासाहेब गोडबोले, यांचे भाषण झाले. नंतर प्रमुख पाहुणे अभंग सूर्यवंशी पर्यावरण तज्ञ यांचे भाषण झाले. सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले हा कार्यक्रमाला देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे,या गावचे नवनियुक्त सरपंच सौ. अंजनाबाई बिबिनवरे, उपसरपंच विनायकराव पाटील, प्रमुख पाहुणे अभंग सुर्यवंशी कवठाळा, बाळासाहेब गोडबोले,कुशावर्ता बेळे,मंडळाधिकारी व्हि एम केंद्रे, तलाठी उत्तम जाधव, ग्रामसेवक एम व्हि सगर, वरुनराज सुर्यवंशी,सहभागी प्रेरक प्रेरिका,शिक्षक अंगणवाडी सेविका, मदतीनिस ,आशा कार्यकर्ती, पुरुष, महिला गावातील भजणी मंडळ, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी व मंडळ अधिकारी ,
जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, चला जानु या नदीला यात्रेचा समारोप मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.