निवडणूक खर्च सादर करा, अन्यथा कार्यवाही : तहसीलदार सुरेश घोळवे.
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील ८ ग्रामपंचायातींच्या निवडणुकीत २२८ पैकी २१२ उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला आहे. मात्र, अद्यापही १६ उमेदवारांनी निवडणूक खर्च १७ जानेवारी २०२३ पर्यंत सादर केलेला नाही. तो मुदत काळात सादर करावा, अन्यथा कार्यवाही केली जाईल, असे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी कळविले आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या आठ निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, या निवडणुकीचे निकाल २० डिसेंबर २०२२ रोजी जाहीर झाले आहेत. निकाल जाहीर केल्यानंतर एक महिन्याचा आत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी आपला निवडणूक काळातील खर्चाचा हिशोब तहसील कार्यालयात सादर करायचा असतो. तालुक्यातील १६ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. तो मुदत काळात सादर करावा, अन्यथा कार्यवाही केली जाईल. असे देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी कळविले आहे.