महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यास प्रारंभ

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यास प्रारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा, मातृभाषेची गोडी निर्माण व्हावी, या हेतूने हा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे, असे मराठी विभाग प्रमुख डॉ.दीपक चिद्दरवार यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री श्रीमती अर्चना नळगीरकर , श्रीमती नीता मोरे , श्रीमती सुहासिनी सुरशेटवार या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या कविता सादर केल्या. मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा, आणि तिचे संवर्धन व्हावे. असे मत डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी अध्यक्षीय समारोपात मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अर्चना मोरे यांनी तर आभार प्रा.डॉ.बी.आर.दहिफळे यांनी मानले. कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के. मस्के, पर्यवेक्षक प्रा.जे.आर.कांदे, प्रा.डॉ.व्ही.पी. पवार, प्रा.डॉ.एस.जी.पाटील, प्रा.डॉ.एम.पी.मानकरी,प्रा.डॉ.आर.बी.
आलपूरे, प्रा.डॉ.बी.एस.भुक्तरे, प्रा.डॉ.एस.व्ही.भद्रशेट्टे, प्रा.डॉ.के.एस.भदाडे, प्रा.प्रिया बळवंत व महाविद्यालयातील पदवी पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author