आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज देवणी येथे निरोप समारंभ संपन्न

आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज देवणी येथे निरोप समारंभ संपन्न

देवणी/रणदिवे लक्ष्मण
एक स्पष्ट , निष्पक्ष आणि सक्षम ,इत्यादी गुण अंगीकृत सुप्रिया अनिल कांबळे यांचा दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी आबासाहेब इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेज देवणी येथे निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोविंदरावजी भोपनिकर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून न.पं.बांधकाम सभापती अनिल इंगोले, कै. रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव सोनटक्के,अनिल रोटे, अंकुश बागवाले, उमाकांत बर्गे आणि अनिल कांबळे यांची उपस्थिती लाभली. जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनीचे संस्था अध्यक्ष गोविंदरावजी भोपनीकर यांच्या हस्ते मुख्याध्यापिका सुप्रिया कांबळे यांना “बेस्ट प्रिन्सिपॉल चे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गोविंदरावजी भोपनीकर यांनी सुप्रिया कांबळे यांच्या कार्याची प्रशंसा करत, पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपले अध्यक्षीय भाषण केले. तसेच अनिल इंगोले आणि अनिल कांबळे यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक रणजीत गायकवाड यांनी कवितेच्या माध्यमातून निरोप देत आपले मत व्यक्त केले. शिक्षिका रेणुका पतंगे यांनी गीत सादर केले.विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतामधून भावना व्यक्त केल्या.
जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गोविंदरावजी भोपनीकर आणि संस्थेचे सचिव गजाननजी भोपनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका मंटोळे यांनी केले तर आभार डॉ. सत्यवान सोनटक्के यांनी मानले. आदर्श मुख्याध्यापिका म्हणून गौरविण्यात आलेल्या सुप्रिया कांबळे यांना निरोप देते वेळेस संपूर्ण शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते, असा अविस्मरणीय क्षण शाळेत निरोप समारंभाच्या वेळी पाहायला मिळाला आणि यशस्वीरित्या हा कार्यक्रम संपन्न झाला.

About The Author