लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रक्तदान शिबिर संपन्न

लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रक्तदान शिबिर संपन्न

लातूर (एल.पी.उगीले) : केंद्र शासनाने राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह दि 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित केला आहे. दि. 17 जानेवारी 2023 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर यांच्या वतीने रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भालचंद्र ब्लड बँक सुभाष चौक येथील कर्मचारी संजय कुलकर्णी , जयप्रकाश सुर्यवंशी, तंत्रज्ञ, फरहान शेख, तंत्रज्ञ, संतोष पाटील, सुरेखा हजारे, तंत्रज्ञ, अमर पुरबूरे, चालक, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील समीर इसाक सय्यद, मोटार वाहन निरीक्षक, एम, एम, गवारे, मोटार वाहन निरीक्षक, मन्मथ कुदळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, उध्दव चव्हाण, कनिष्ठ लिपिक, उमेश सांगळे, कनिष्ठ लिपिक, दिलीप कांबळे, कनिष्ठ लिपिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!