एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी शिस्त आणि अनुशासन पाळावे

एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी शिस्त आणि अनुशासन पाळावे

अहमदपूर (गोविंद काळे) : शालेय आणि महाविद्यालयीन जीवना मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी शिस्त आणि अनुशासन पाळावे असे प्रतिपादन एन सी सी सेवन महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे हवलदार मनोहर जाधव यांनी केले. ते दि. 18 रोजी यशवंत विद्यालय एन सी सी च्या विद्यार्थ्यांना सराव शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. व्ही. गंपले, व्यासपीठावर पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, हवालदार बलविंदर सिंग, अरुण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला एन सी सी ऑफिसर मधुबाला आंधळे यांनी सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार एन सी सी ऑफिसर अशोक पेदेवाडे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन सी सी च्या मुलींनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!