वीरशैव तेली समाज महिला मंडळ, लातूर च्या वतीने हळदी कुंकुच्या माध्यामातून कुंडी वाटप
लातूर (प्रतिनिधी) : वीरशैव तेली समाज महिला मंडळ, लातूर च्या वतीने मकर संक्रात निमित्त कुंडी वाटप करून झाडे लावा..झाडे जगवा…पर्यावरण समतोल राखण्यासाठी हळदी कंकूच्या कार्यक्रतुन संदेश देण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन समाजातील जेष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आला तसेच उपस्थित महिलांना कार्यक्रमात देण्यात येणाऱ्या वाणाचा उद्देश पर्यावरण समतोल राखण्यासाठी झाडे लावणे व त्याचे काळजीने जतन करून त्यास कसे जागवत्ता येईल या बाबत माहिती दिली प्रत्येकाच्या घरी देण्यात आलेल्या कुंडी मार्फत झाड लावण्याचा व जगवण्याचा संदेश देण्यात आला प्रतयेक नागरिकांनी समाजानी आपल्या अंगणात एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे या उपक्रमाच्या माध्यामातुन संदेश देण्याचा प्रयत्न केला. यावेळी समाजातील जेष्ठ महिला सौ. छाया चिंदे, शोभा लोखंडे, कमल कँटीकर, महानंदा देशमाने, शिलाताई खडके, तारामती राऊत, मेघा भुजबळ, राजेश्री कलशेट्टी, अश्विनी लोखंडे, मंजुषा पाडुळे,माया कलशेट्टी,प्राजक्ता लोखंडे, संगीता उदगीरे, मीनाक्षी राऊत, नीलम कंठेकर,सुरेखा कलशेट्टी, कुसुम भोसेकर,ललिता निर्मळे,सुनीता नाईक,रत्नमाला कुडके, माहेश्वरी क्षीरसागर, शुभांगी भुजबळ,वनिता व्यवाहारे, रोहिणी लोखंडे, वर्षा चोपडे, सोनाली होकळे, प्रिया मैदरगिकर, सीमा व्यवहारे, रेखा कलशेट्टी,कावेरी कलशेट्टी, आदी तसेच वीरशैव तेली समाजातील महिला व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होता.