राजू नागरगोजे यांचा सत्कार संपन्न

राजू नागरगोजे यांचा सत्कार संपन्न

उदगीर ( एल. पी. उगीले) : जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले राजू नागरगोजे यांचा सत्कार आणि सन्मान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष केशवराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली 4 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने उदगीर येथे उदगीर, जळकोट, देवनी या तीन तालुक्यातील शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्ये राजू नागरगोजे यांनी प्रवेश केला, आणि समिती अंतर्गत सक्रिय सहयोग देण्याचे मान्य केले.या वेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशनराव बिरादार यांनी राजू नागरगोजे यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार केला. समितीच्या इतर सर्व पदाधिकारी, सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.

About The Author

error: Content is protected !!