ग्रामस्थांच्या वतीने केलेला सत्कार लाख मोलाचा – गणेश मुंडे
उदगीर (एल. पी. उगीले) : कित्येक वेळा “घर की मुर्गी दाल बराबर” या म्हणी प्रमाणे घरातल्या माणसाची फारशी किंमत केली जात नाही, किंवा त्याने मिळवलेल्या यशाबद्दलही फारसे गांभीर्य घेतले जात नाही. मात्र जेव्हा एखाद्याने हे गांभीर्य ओळखून त्याचा मान सन्मान केला तर, बाहेर झालेल्या हजारो सत्कारापेक्षा घरातून गावातून झालेला सत्कार हा लाख मोलाचा असतो. असे विचार व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे उदगीर तालुका अध्यक्ष गणेश मुंडे यांनी व्यक्त केले.
ते डोंगर शेळकी येथे अर्थात गणेश मुंडे यांच्या गावीच डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी गणेश मुंडे यांना मिळालेले या सन्मानाबद्दल शाल, श्रीफळ व आध्यात्मिक पुस्तक भेट देऊन केलेल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
पुढे बोलताना गणेश मुंडे म्हणाले की, समाजामध्ये वावरत असताना सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक ठिकाणी सत्कार झाले, होत आहेत. मात्र घरच्यांनी कौतुकाची दिलेली थाप हे आपल्यासाठी लाखमोलाची आहे. तशीच ती प्रेरणादायी आणि कर्तव्याची जाणीव देणारी सुद्धा आहे, असे सांगितले.