राष्ट्रीय एकात्मतेतून शैक्षणिक समन्वय साधत महात्मा फुले महाविद्यालयाची ऐतिहासिक सहल संपन्न

राष्ट्रीय एकात्मतेतून शैक्षणिक समन्वय साधत महात्मा फुले महाविद्यालयाची ऐतिहासिक सहल संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली परिसरातील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक घटकांसह राष्ट्रीय एकात्मतेतून शैक्षणिक समन्वय साधत शैक्षणिक वर्ष- २०२२-२३ या वर्षातील सहल आनंदी वातावरणात पार पडली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालय हे या परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळीचे केंद्रबिंदू बनले असून, महाराष्ट्रातील ख्यातनाम पत्रकार, लेखक, समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली या महाविद्यालयाच्या अहमदपूर पासून निघून प्रारंभी गुराखी गड कंधार येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार व खासदार स्वर्गीय भाई डॉ. केशवरावजी धोंडगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सहलीची सुरुवात झाली. त्यानंतर कंधार येथील ऐतिहासिक राष्ट्रकूट कालीन भुईकोट किल्ल्यासह, ख्वाजा पाशा हाजी शहा सरोवर -ए- मगदूम दर्ग्याला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते चादर चढविण्यात आले.

त्यानंतर शीख धर्माचे तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या सचखंड गुरुद्वाराला भेट देण्यात आली.येथे‌गुरू का लंगर मध्ये दुपारचे जेवण घेतले. यावेळी सर्व ऐतिहासिक स्थळांची सविस्तर माहिती महाविद्यालयाचे चालतं बोलतं विद्यापीठ असलेले इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिली. या सामाजिक, धार्मिक स्थळांबरोबरच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला ही भेट देऊन शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळविलेल्या विद्यापीठाची हे माहिती प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच नांदेड येथील पार्ले बिस्कीट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला उपप्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख दुर्गादास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.

या प्रसंगी संपूर्ण विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची एकदिवसीय शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. ही सहल अहमदपूर – लोहा – कंधार मार्गे नांदेड येथे नेण्यात आली.त्यानंतर कंधार येथील ऐतिहासिक हाजी शहा दर्गाह येथे भेट देऊन विद्यार्थ्यांनी सुफी संत परंपरा समजून घेतली. यावेळी परवेज सरवर मौलाना, हपिन मतीन शहा, रफिक भाई, सय्यद सरफराज यांनी हाजी शहा दर्जाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ऐतिहासिक अशा भव्य दिव्य कंधारचा किल्ला पाहून इतिहासही अभ्यासला. या सहलीचे आयोजन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, सहल प्रमुख डॉ. प्रकाश चौकटे, सहल सह प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. सतीश ससाणे,आय क्यू एसी प्रमुख डॉ.एन.यु.मुळे,प्रा.ए.सी.आकडे, भूगोल विभागाचे डॉ.डी.एन.माने, डॉ.एस.एच.गर्जे, ग्रंथपाल प्रा.पी.एम.इंगळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यांनी केले.

About The Author