अवैध धंद्याची तक्रार व माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मोबाईल नंबर वर प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अवघ्या दहा दिवसात अवैध धंद्याविरुद्ध विरुद्ध 27 गुन्हे दाखल.

अवैध धंद्याची तक्रार व माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मोबाईल नंबर वर प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अवघ्या दहा दिवसात अवैध धंद्याविरुद्ध विरुद्ध 27 गुन्हे दाखल.

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद व्हावेत या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी अवैध धंद्याच्या विरुद्ध तक्रार करावयाची असल्यास किंवा माहिती द्यायची असल्यास स्वतःच्या मोबाईल नंबर वर तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्या मोबाईलवर आलेल्या तक्रारीनुसार 27 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्याचे लातूर जिल्ह्यातून समुळ उच्चाटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश संपूर्ण लातूर जिल्हा पोलीस दलाला दिलेले आहेत. शिवाय अवैध धंद्याविरुद्ध थेट पोलीस अधीक्षकाकडे तक्रार अथवा अवैध धंद्याची माहिती देण्याकरिता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी स्वतःचा मोबाईल नंबर उपलब्ध करून दिलेला आहे.

सदरच्या मोबाईल वरून प्राप्त होणाऱ्या माहिती व तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. सदरचे पथक थेट पोलीस अधीक्षकांना रिपोर्ट करणार आहे.

दिनांक 09/01/2023 ते 19/01/2023 अवघ्या दहा दिवसात सदर मोबाईल नंबर वरून मिळालेल्या माहिती व तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दहा दिवसात 47 लोकाविरुद्ध 27 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

यामध्ये अवैध दारू विक्री-15, जुगार-09, गांजा विक्री-01, हातभट्टी 01, प्रतिबंधित मांजा विक्री-01,इत्यादी प्रकारच्या अवैध धंद्यावर केलेल्या कारवाईचा समावेश आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकाने केली आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याची मोहीम यानंतरही चालू राहणार आहे. पोलीस अधीक्षकांनी उपलब्ध करून दिलेला मोबाईल क्रमांक 8275000778 यावर नागरिक अवैध धंद्याविरुद्धची माहिती अथवा तक्रार मेसेज किंवा व्हाट्सअप करून देऊ शकतात. तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून नागरिकांनी अवैध धंद्याविरुद्धची माहिती निर्भयपणे मेसेज अथवा व्हाट्सअप द्वारे द्यावी. पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन तक्रारीची खातरजमा करून गुन्हेगाराविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.अशीही माहिती पोलीस अधिकारी यांनी सांगितले आहे.

About The Author