नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या – परिचारिका संघटनेचे अध्यक्ष भक्तराम फड

लातूर (एल.पी.उगीले) : संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नर्स, कंपाउंडर म्हणून समाजसेवा करण्याच्या उद्देशाने प्रेरित झालेल्या विद्यार्थिनींना लुबाडण्यासाठी काही संस्थाचालकांनी मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना नर्सिंग कोर्सला प्रवेश दिलेला आहे. यासंदर्भात वर्धा जिल्ह्यात काही संस्था चालकांनी बोगस नर्सिंग महाविद्यालय काढून विद्यार्थिनींची फसवणूक केली आहे. त्या संदर्भात सविस्तर चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. कारण शिक्षणाच्या बाजारीकरणात हजारो विद्यार्थिनींचे भविष्य अंधारमय होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. एका बाजूला त्यांची आर्थिक लूट झालेली आहे. तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान ही होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन शासनाच्या वतीने सर्व बोगस नर्सिंग कॉलेजचे मान्यतेचे प्रस्ताव पडताळून घ्यावेत, तसेच ज्या कॉलेजला परवानगी नसतानाही भरती झालेली आहे. त्या विद्यार्थिनींचे मूळ कागदपत्रे आणि शुल्क भरलेले पैसे परत द्यावेत. अशी मागणी भक्तराम फड यांनी केलेली आहे. तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची परवानगी नसताना या कॉलेजनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून त्यांची आर्थिक लूट केलेली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी. अशीही मागणी केलेली आहे.

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या - परिचारिका संघटनेचे अध्यक्ष भक्तराम फड

कित्येक महाविद्यालयांमध्ये विधवा, परितक्ता महिला, मध्यमवर्गीय सुशिक्षित बेकार, काम करून लोन घेऊन शिकणारे व सर्व मध्यम वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनी असल्याने त्यांना भाड्याने रूम घेऊन राहणे परवडणारे नाही. तरी या संदर्भात ताबडतोब चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. ही अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही सदरील निवेदनात देण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची फसवणूक झाली आहे. याचा गांभीर्याने विचार करून भविष्यात दुसऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या वर योग्य कारवाई करावी. तसेच त्या ठिकाणी भरलेल्या कर्मचारी वर्गाचा ही सहानुभूती पूर्ण विचार केला जावा. त्यामुळे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने व महाराष्ट्र नर्सिंग पॅरामेडिकल स्टेट बोर्ड तसेच राज्य शासनाने सर्व कॉलेजची तात्काळ चौकशी करावी. अशी मागणी परिचारिका संघटनेचे अध्यक्ष भक्तराम फड यांनी केली आहे.

About The Author