जे नसेल ललाटी, तेही लिहितो तलाठी!!!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पाठीत बसते काठी!!!

जे नसेल ललाटी, तेही लिहितो तलाठी!!!<br>लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पाठीत बसते काठी!!!

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर तहसील येथे कार्यरत असलेले तलाठी पदावरील ज्ञानोबा हनुमंतराव करमले (वय 35 वर्ष, रा. हंगरगा ता. मुखेड जि. नांदेड) नेमणूक बोरगाव (बु) कोदळी, तहसील उदगीर जिल्हा लातूर तसेच श्रीमती अलका ज्ञानोबा करमले (वय 23 वर्षे, गृहिणी रा. हंगरगा ता. मुखेड जि. नांदेड), हनमंतराव निवृत्ती करमले (वय 64 वर्ष रा. हंगरगा ता. मुखेड जि. नांदेड) यांनी तलाठी ज्ञानोबा हनमंतराव करमले यांना अपसंपदा जमा करण्यास अप प्रवृत्त केले. अशा स्वरूपाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

त्यांच्या संपत्तीची उघड चौकशी झाल्यानंतर त्यांच्याकडे आढळून आलेल्या 34 लाख 75 हजार 886 रुपयांचा हिशोब ते देऊ शकले नाहीत. याचाच अर्थ त्यांनी त्यांचे लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत (दिनांक 10 ऑक्टोबर 2012 ते 31 ऑगस्ट 2020) या कालावधीमध्ये त्यांना कायदेशीर रित्या प्राप्त असलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत त्यांच्याकडे आढळून आलेले अधिक मालमत्तेबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. एकंदरीत परीक्षण कालावधी दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी त्यांचे ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत 34 लाख 75 हजार 886 रुपयाची अपसंपदा संपादित केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर अपसंपदा संपादित करण्यासाठी त्यांची पत्नी अलका आणि वडील हनमंतराव यांनी सदर मालमत्ता आरोपी लोकसेवक यांच्या वतीने स्वतःच्या नावावर बाळगून ज्ञानोबा करमले यांना अप प्रेरणा दिली, व मालमत्ता हस्तगत करण्यास प्रोत्साहन देऊन सहकार्य केले आहे. म्हणून या तिन्ही आरोपीच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या तक्रारीवरून जळकोट पोलीस स्टेशन येथे गु. र. नंबर 21/23 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 13 (1)( ई) सह 13 (2 )व भारतीय दंड विधान संहितेचे कलम 109 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (सुधारणा 2018) चे कलम 13 (1) (ब) सह 13 (2), 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपअधीक्षक पंडित रेजितवाड हे करत आहेत.

सदरील गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड परिक्षेत्र विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आला आहे. संपत्तीची उघड चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांनी केली आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेले आहे की, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्य काळामध्ये भ्रष्टाचार करून अपसंपदा धारण केले असेल, किंवा शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केली असल्यास किंवा करत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

About The Author