निलंगा तालुक्यात घरफोडी करून 14 लाख 60 हजाराचा ऐवज लंपास!

लातूर (एल.पी.उगीले) : निलंगा तालुक्यातील राठोडा येथे अज्ञात चोरट्यांनी घरपोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 14 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज पळवला आहे. एका बाजूला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने एका मागून एक गुन्हे उघडकिस येत असतानाच अशा पद्धतीच्या मोठ्या घरफोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राठोडा येथे एकाच रात्रीत चार ठिकाणी घरपोडी झाली असून चोरट्यांनी परिसरात दहशत निर्माण केली आहे. रमाकांत दरेकर यांनी घेतलेल्या प्लॉटचे पैसे देण्यासाठी आपल्या घरी रोख रक्कम बारा लाख रुपये ठेवले होते, ते अज्ञात चोरट्यांनी दिनांक 19 व 20 जानेवारी रोजी च्या रात्री अकरा ते पाच वाजण्याच्या दरम्यान लोखंडी रॉड ने कुरूप तोडून घरात घुसून धाडसी चोरी करून रमाकांत दरेकर यांची रक्कम पळवली आहे. तसेच दिलीप कंठाळे, अनिल कंठाळे व सोमवंशी या तिघांचेहीघरी चोरी करून रोख रकमेसह दोन लाख वीस हजार रुपये सोन्याचे दागिने असे एकूण 14 लाख 60 हजार रुपये लंपास केले आहेत.

निलंगा तालुक्यात घरफोडी करून 14 लाख 60 हजाराचा ऐवज लंपास!

या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला कळल्यानंतर लगेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानपथक राठोडा येथून निटुरच्या दिशेने गेले असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात रमाकांत दरेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या 457, 380 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निलंगा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रताप गर्जे हे करत आहेत.

About The Author