गाव तिथे शिवसेना, घर तेथे शिवसैनिक अभियान प्रभावी राबवा – कैलास पाटील

उदगीर (एल. पी. उगिले) उदगीर तालुक्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खंबीरपणे सर्व ताकतीनिशी उभी करण्याच्या दृष्टीने शिवसैनिकांनी मोठ्या जिद्दीने “गाव तेथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक” हे अभियान प्रभावीपणे राबवावे. असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पाटील यांनी केले आहे.

गाव तिथे शिवसेना, घर तेथे शिवसैनिक अभियान प्रभावी राबवा - कैलास पाटील

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहाने हे अभियान राबवण्यासाठी जीवाचे रान करायला सुरुवात केली आहे. या कार्याचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा उपप्रमुख अंकुश कोनाळे, शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाशअण्णा हैबतपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान उदगीर तालुक्यातील दावणगाव, तीवटघ्याळ, कुमदाळ या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, आणि हे अभियान प्रभावीपणे राबवत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी उपतालुकाप्रमुख महेश फुले, वाहतूक सेना तालुकाप्रमुख शरदभैय्या सावरे, परमेश्वर नरहरे, मनोज फुले, बाळू हुरसनाळे, दिनकर बिरादार, भाऊसाहेब भंडे, अंकुश हुरसनाले, श्रीकांत जाधव, गोविंद हंगरगे, अजय फुले, श्री जाधव यांच्यासह तालुकाप्रमुख कैलास पाटील, अंकुश कोनाळे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!