प्रा. सिद्धेश्वर पटणे यांचा सत्कार संपन्न

प्रा. सिद्धेश्वर पटणे यांचा सत्कार संपन्न

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर येथील प्रख्यात इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक तथा सौराष्ट्र सहकारी बँकेचे संस्थापक चेअरमन, पी टी ए चे तालुकाप्रमुख प्रा. सिद्धेश्वर पटणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी येथे दर्शनासाठी गेल्यानंतर तेथील देवस्थान प्रशासनाच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य पीटीएचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. गोपाळकृष्ण घोडके परिवाराच्या वतीने प्रा. सिद्धेश्वर पटणे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे मार्गदर्शक तथा श्यामलाल शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक जी.ए. पटणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाने प्राध्यापक सिद्धेश्वर पाटणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!