शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 30 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 30 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

लातूर (एल.पी.उगीले) : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यासाठी 30 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/ जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) ,शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21, 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन डाउनलोड करुन व्यवस्थितरित्या भरून लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 जानेवारी, 2023 अशी ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून अद्ययावत माहिती पहावी. तसेच पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळांडूनी “विहीत मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author