शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग ; गुन्हा दाखल

शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग ; गुन्हा दाखल

उदगीर (एल.पी.उगीले) : शाळेतून घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीस आरोपीने रस्त्यात वाईट उद्देशाने हात पकडून जवळ ओढत विनयभंग केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की , एक १५ वर्षीय अल्पवयीन शालेय विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना शाळेच्या पाठीमागेच आरोपी अक्षय शंकर शिंदे ( रा. जयप्रकाशनगर उदगीर ) हा सदर मुलीचा पाठलाग करून वाईट उद्देशाने हात धरून जवळ ओढून तू मला का बोलत नाहीस? असे म्हणून तिची छेड काढली. तू जर मला नाही बोललीस तर, तुला मी खतम करून टाकीन. अशी धमकी देऊन छेड काढून विनयभंग केला. सदर शालेय मुलीने घाबरून घरी जाऊन सदरची घटना तिच्या पित्यास सांगितली. तिच्या वडिलांनी आरोपीस येऊन, जात विचारले असता आरोपींनी मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशा आशयाची तक्रार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरून आरोपी विरुद्ध गु. र. न. ३० / २३ कलम ३५४ , ३५४ ( ड ) , ५०४ , ५०६ भा.दं.वि. आणि सहकलम ८ , १२ बा. लै. अ. अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करीत आहेत.

About The Author