महिलेस मारहाण करून विनयभंग ; गुन्हा दाखल

महिलेस मारहाण करून विनयभंग ; गुन्हा दाखल

उदगीर (एल.पी.उगीले) : घरासमोर थांबलेल्या महिलेस आरोपीने मारहाण व झोंबाझोंबी करून विनयभंग केला व जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशी तक्रार उदगीर ग्रामीण पोलिसात दाखल झाल्याने एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , २९ वर्षीय फिर्यादी महिला ही तिच्या घरासमोर थांबलेली असताना आरोपी राहूल देविदास कूंडगीर ( रा. इस्मालपूर ता. उदगीर ) हा तिथे येऊन तू माझ्यासोबत चल, व माझी बायको म्हणून राहा. असे म्हणून शिवीगाळ करून हाताला धरून झोंबाझोंबी केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून स्त्री जातीला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशी तक्रार सदर महिलेने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून आरोपीविरुद्ध गु. र. नं. ३१ / २३ कलम ३५४ , ३२३ , ५०४ , ५०६ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पो.ना. शिंदे हे करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!