साक्षर भारत योजनेतील प्रेरक प्रेरिका यांच्या मानधनासाठी सक्षमपणे मानधन व नवीन योजनेत भाग पाडणार – भुजंग अर्जुने

साक्षर भारत योजनेतील प्रेरक प्रेरिका यांच्या मानधनासाठी सक्षमपणे मानधन व नवीन योजनेत भाग पाडणार - भुजंग अर्जुने

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : महाराष्ट्र राज्य साक्षर भारत संघटना जिल्हा लातूर यांच्या वतीने वलांडी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष उद्धव गायकवाड व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या बैठकीला सुरुवात करण्यात आली. भुजंग अर्जुने यांनी आपल्या साक्षर भारत योजनेतील मानधन व नवीन योजना “लिखना, पढना” योजनेत प्रेरक प्रेरिका यांना सामावून घेणे, अनेक प्रश्नांची माहिती देण्यात आली , ‌व बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली.थकीत मानधन मिळणे, लिखना पढणा योजेनेत प्रेरक यांना सामावून घेणे, शैक्षणिक पात्रेनुसार प्रेरक यांना शासकीय सेवेत सामावून घेणे,अंशकालीन दर्जा देणे,दिल्ली,मुबई,किंवा पुणे येथे भगवानराव देशमुख ,दत्ता देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणे,आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांना मागणीचे निवेदन देणे,या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीला महाराष्ट्र राज्य साक्षर भारत संघटना जिल्हाध्यक्ष भुजंग अर्जुने, जळकोट तालुकाध्यक्ष रामदास कदम, निलंगा तालुकाध्यक्ष प्रकाश घोरपडे, वसंत बिबिनवरे , प्रा.रतन सुर्यवंशी, वरुनराज सुर्यवंशी,माधव कोटे, सुधाकर कांबळे, विठ्ठल लोंढे, विशाल फुलारी, शिवाजी सुर्यवंशी, अमोल गायकवाड, अरुण बिरादार आदि मान्यवर उपस्थित होते.प्रेरक, प्रेरिका पंढरी जोळदापके, महानंदा तादलापुरे,छाया गायकवाड, निलंगा तालुक्यातील प्रेरिका काळे उर्मीला,कोराळे रेखा, पंचफुला सुर्यवंशी,पदमिन गायकवाड, यशवंत सोनकांबळे,हुसेन गायकवाड, शिवाजी सोनकांबळे,केरबा सुर्यवंशी,आवळे रेखा, शिवदास गायकवाड, उर्मिला घोडके,त्रिशला कांबळे,आशाबी शेख,ऎनिले सुनंदा, वाघमारे शाहू,आशोकवाड सुशिला, कृष्णा पिंजरे, धनाजी आपटे हे उपस्थित होते या बैठकीचे‌ सुत्रसंचलन रणदिवे लक्ष्मण यांनी तर आभार यशवंत सोनकांबळे यांनी मानले. प्रेरक, प्रेरिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author