राष्ट्रीय रेड्डी (यलम) संस्था, औरंगाबाद येथे १४ वा वार्षिक स्नेह मेळावा संपन्न

राष्ट्रीय रेड्डी (यलम) संस्था, औरंगाबाद येथे १४ वा वार्षिक स्नेह मेळावा संपन्न

औरंगाबाद (एल.पी.उगीले) : कै. हरिरामजी पन्हाळे स्मृती सभागृह बीड बायपास, औरंगाबाद येथे दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय रेड्डी (यलम) संस्थेचा १४ वा वार्षिक स्नेह मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. यावेळी विविध कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वाळूज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी समाज बांधवांना आजच्या काळात बदलेली आहार पद्धती व त्यामुळे निर्माण होणारे नवनवीन आजार आणि त्यापासून आपण कशाप्रकारे बचाव करावा. याविषयी सखोल मार्गदर्शन केले. योग्य आहार व व्यायाम पद्धतीने आपण आपले आजार कशाप्रकारे रोखू शकतो, याबाबतीत मार्गदर्शन केले. आनंदी जीवन जगण्यासाठी आहाराचे महत्त्व, सकस व सात्विक आहार कोणता? आणि तो किती प्रमाणात घ्यावा, याविषयीचे गुपिते त्यांनी सर्वाना सांगितले. सोबतच त्यांनी महिला विषयक कायदे व महिलांची सुरक्षितता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. नंदकुमार गुरडे यांनी भूषविले. व्यासपीठावर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे, सौ. मंदाकिनी पन्हाळे आणि सौ. रागिणी कंदाकुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. प्रविणा संजीव उगिले (विशेष शास्त्रज्ञ), गोविंद प्रल्हाद पाटे (उप अभियंता, महानगरपालिका औरंगाबाद), कु. अनुजा गोविंद पाटे (एमबीबीएस पदवी), शरयू संकेत उगिले (महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग १ उत्तीर्ण.), अक्षय शिवाजी चामले (एमबीबीएस व पदव्युत्तर शिक्षण, जेनेटिक), विद्या निवृत्ती चामले – कोतवाड (राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग, उप विभागीय अभियंता), कु. श्रुती गणेश कोतवाड (रैटली डॉट कॉम – स्टार्टअप मध्ये यशस्वी सहभाग), प्रदीप पोटे (राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पदी पदोन्नती) इत्यादींचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि. धोंडीराम कासले, यांनी मांडले. तर सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय येडले व कु. गीतांजली भंडारे यांनी केली.आभार प्रदर्शन इंजि. गोविंद पाटे, यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अल्पोपहाराची व्यवस्था डॉ. प्रवीणा संजय उगिले व परिवारा तर्फे करण्यात आली होती .

About The Author

error: Content is protected !!