देवणी तालुक्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील विविध ठिकाणी मोठया उत्साहात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण तहसील कार्यालयात तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या हस्ते करण्यात आले, पंचायत समिती मध्ये सहा,गटविकास अधिकारी कांबळे व्हि.एस., नगरपंचायत येथिल नगराध्यक्षा डॉ किर्ती घोरपडे, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शाळा, महाविद्यालये ग्रामीण भागात देवणी खुर्द येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजमंदिर समोरील सोनाली रणदिवे, बौद्ध समाज मंदिर समोरील सुभाष पाटील, आरोग्य उपकेंद्र केंद्र डॉ संजय घोरपडे, ग्रामपंचायत कार्यालय समोरील सरपंच यशवंत कांबळे,जि प प्रा शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच यशवंत कांबळे,रतन गरड चेअरमन, उपसरपंच विठ्ल शिंगडे, रमेश कांबळे, अनिल कांबळे, संचालक देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती, व्हाईज चेअरमन माधव पाटे,पोलिस पाटील तुकाराम पाटील, ग्रामसेवक अनिल आवले, मुख्याध्यापक कांबळे कांत, केंद्रप्रमुख नरवटे के,एन, शिक्षक पुंड डि वाय, बिरादार एस पी,चांडेश्वरे एस,डी,तेजेवाड डि,आर, ग्रामपंचायत सदस्य माधव रणदिवे,अंगणवाडी सेविका दैवशाला कांबळे सरोजा गायकवाड,मदतनीस हौशाबाई सारगे, अयोध्या सुर्यवंशी, राजकुमार गरड,ग्रामरोजगार सेवक प्रभू काकनाळे, विजयकुमार सुर्यवंशी ज्ञानोबा कांबळे, निवृत्ती कांबळे, मधुकर कांबळे, दिपक रणदिवे, सुनिल कांबळे, तुकाराम रणदिवे, सागर रणदिवे मोहन रणदिवे, प्रशांत रणदिवे रंगराव रणदिवे, दादाराव गायकवाड, पत्रकार रणदिवे लक्ष्मण, प्रेरिका मनिषा बिरादार, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रणदिवे लक्ष्मण पुंडलिक, आणि विविध उपक्रमासह भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.मानवंदना देण्यात आली. तसेच जि प प्रा शाळेत विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.भव्य प्रभात फेरी शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये देशभक्तीपर गीत , सादर करून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
