अतनुरात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया ऊधोग योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

अतनुरात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया ऊधोग योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

अतनूर (एल.पी.उगीले) : मौजे अतनूर ता.जळकोट येथे प्रधानमंत्री सूक्ष्म व अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या कार्यशाळेचे आयोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळकोट व आत्मा मार्फत कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती सप्ताह अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म व अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रशेखर पाटील हे होते.तर प्रमुख उपस्थितीत उपसरपंच बाबू कापसे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बारसुळे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास सोमुसे, ग्रामसेवक एफ.एफ.शेख, कृषी सहाय्यक संदीप पाटील, कृषी सहाय्यक किरण सोमवंशी, कृषी सहाय्यक आनंद सोनकांबळे, विशाल इंगळे, सुधाकर कांबळे, साईनाथ पवार, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिलाष क्षीरसागर, कृषी मित्र शिवराज रेड्डी, कुणबी शेतकरी गटाचे अध्यक्ष शेतकरी बी.जी.शिंदे हे उपस्थित होते.

सदरील कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा संसाधन व्यक्ती डी.बी.शिंदे-पाटील यांनी योजनेची माहिती सुक्ष्म अन्न प्रक्रिया अंतर्गत कोणकोणते व्यवसाय करता, येतात,उदा; तेलघना, बेकरी, मिरची कांडप, पिठाची गिरणी, दुग्ध प्रक्रिया, पशुखाद्य अशा विविध व्यवसायाचे मार्गदर्शन बँकिंग क्षेत्राचे प्रोसेसिंग, कागदपत्राची मांडणी, जागेचा आराखडा, लाभार्थी ट्रेनिंग, प्रस्ताव मांडणी, प्रोजेक्ट रिपोर्ट, मार्केटींग इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी लाभार्थी निवडीचे निकष, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, बँकेची प्रक्रिया व योजनेच्या अनुदाना संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कृषी सहाय्यक संदीप पाटील यांनी २०२३ वर्ष हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे,असे सांगून शेतकऱ्यांनी तृणधान्य जसे की ज्वारी, नाचणी, बाजरी, भगर इत्यादी पिकांची जास्तीत जास्त लागवड करावी. व तृणधान्य पिकाकडे कल वाढवावा. तसेच इतर धान्य पिकांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिलाष शिरसागर यांनी केले. तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक एफ.एफ.शेख यांनी केले. सदर कार्यशाळेला अतनूरसह परिसरातील गुत्ती, रावणकोळा येथील शेतकरीही उपस्थित होते. सदर कार्यशाळेला शिवराज रेड्डी, राहुल गायकवाड, विकास सोमुसे, पंढरीनाथ गव्हाणे, लक्ष्मण चव्हाण, संग्राम कापसे, फर्जंद मुंजेवार, प्रमोद संगेवार, ईश्वर अतनूरकर, गुंडू बोडेवार, रामचंद्र गायकवाड तसेच महिला शेतकरी श्रीमती सविता भोंग, नागिन मठदेवरू, उमेदच्या सीआरपी स्वामी इत्यादी शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!