मनसे मध्ये तरुणाईचा वाढता प्रतिसाद
उदगीर (एल.पी.उगीले) : सध्याचे राजकीय परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाकडून, नेत्याकडून तरुणाईचा भ्रमनिराश होताना दिसत आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यातून राजकीय क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या तरुण वर्गाला आश्वासक नेतृत्व फक्त राज ठाकरे यांच्या रूपाने दिसत असल्याने सध्या युवा तरुणांचा ओढा मनसेकडे येताना दिसत आहे. याचाच प्रत्यय गेल्या काही महिन्यापासून उदगीर विधानसभेत दिसत आहे. गेल्या दोन महिन्यात चौथा पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला असून उदगीर मनसेमध्ये मोठ्या संख्येने तरुण पक्षात दाखल होत आहेत. जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते शहराध्यक्ष संतोष भोपळे यांच्या नेतृत्वात अनेक तरुणांनी पक्ष प्रवेश केला. त्यात प्रवीण खोलगाडगे, अनिल बरगे, ओम तेलंगे, दीपक चांडेश्वर, रोहन रंगवाळ, ज्ञानेश्वर उदगिरे, दत्ता पेलंगे, ओमकार सूर्यवंशी, महेश मोमले, राज कांबळे, जाधव भानुदास, चव्हाण किरण, कुणाल पवार, सौरभ राठोड इ. प्रवेश केला.या वेळी ता. अध्यक्ष संग्राम रोडगे,तालुका सचिव सुनील तोंडचिरकर , तालुका उपाध्यक्ष प्रशांत घोणसे,शहर उपाध्यक्ष लखन पुरी मनविसे तालुकाध्यक्ष रामदास तेलंगे, अविनाश ठाकुर आदी उपस्थित होते.
