महात्मा पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : महात्मा पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सुनील माने तसेच सुप्रिया सुनील माने होते. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारतीय सैन्याचे जवान विद्वान मानकरी होते. डॉ. सुनील माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापिका सौ स्मिता तिवारी यांनी प्रास्ताविक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ माने यांनी बदललेल्या जीवन शैलीवर तसेच आरोग्यावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यार्थ्यांचे भाषण तसेच देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले. शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद ग्रामसेवा प्रतिष्ठानचे सचिव दिपक नेत्रगावे पाटील तसेच महात्मा पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ संगीता नेत्रगावे पाटिल यांची उपस्थिती होती. तसेच संतोष खाडे, अमीर शेख, श्रीनिवास रेड्डी, संभाजी खंडागळे, गणेश मुरुमकर, वीरभद्र तोगरगे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री घोंगडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सौ मोनिका अवंडकर, सौ अश्विनी ममदापूरे, सौ जयश्री घोंगडे, सौ शिवकन्या वाघमारे, शिल्पा सांगवे, पांचाळ याचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
