समर्थ विद्यालयात शनिवारी एक दिवसीय शब्दोत्सव : युवा महोत्सव २०२३

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी एक दिवसीय शब्दोत्सव : युवा महोत्सव २०२३ घेण्यात येणार आहे. या निमित्त कथा-कथन, कविसंमेलन, सांस्कृतिक व संगीत शेलापागोटे कार्यक्रमाची विद्यार्थ्यांना दिवसभर मेजवानी मिळणार आहे.

शब्दोत्सव : युवा महोत्सव २०२३ चे उद्घाटन सकाळी १० वा. वाढवणा बु. येथील पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्ष म्हणून संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी आदींची उपस्थिती राहणार आहे. कथा-कथन सत्रात अध्यक्ष म्हणून जळकोट येथील अंबादास केदार, तर कथाकार म्हणून अनिता यलमटे उदगीर, चंद्रशेखर कळसे जळकोट उपस्थित राहणार आहेत. कविसंमेलनात अध्यक्ष म्हणून लातूर येथील नरसिंग इंगळे, तर निमंत्रित कवी म्हणून योगिराज माने, शैलजा कारंडे, नयन राजमाने लातूर, रसूल पठाण, प्रा. रामदास केदार उदगीर, संतोष नारायणकर परभणी आदी उपस्थित राहणार आहेत. या दोन सत्रानंतर अर्ध्या तासाचा मध्यनंतर राहणार असून दुपार सत्रात विद्यार्थ्यांचे विविध कला गुणदर्शन व संगीत शेलापागोटे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सायंकाळी समारोप व १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ ठेवण्यात आला आहे. तरी सदरील कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जेष्ठ प्रा. बी. एस. बाबळसुरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रसूल पठाण, पायवाट संयोजन समितीचे अध्यक्ष वर्षा कवडगावे, संयोजन समिती सदस्य अमर जाधव यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!