राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत विवेक वर्धनीचा संघ उपविजेता

राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत विवेक वर्धनीचा संघ उपविजेता

उदगीर (एल.पी.उगीले) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पूणे.अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर द्वारा आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत विवेक वर्धनी उच्च माध्यमिक विद्यालय देवणी येथील 17 वर्षे वयोगटातील नागेश भरत चामले, वेदांत अमित सिद्धेश्वरे, कृष्णा अंगद कांडगिरी, गोविंद बालाजी चामले, या खेडूंच्या संघाने संभाजी नगर (औरंगाबाद) च्या संघासोबत विजय प्राप्त करत द्वितीय पारितोषिक पटकावले. या प्रसंगी संस्थेचे सचिव भगवानदादा पाटील तळेगावकर, संस्था अध्यक्ष व्यंकटराव पाटील वलांडीकर ,प्राचार्य कांबळे डब्ल्यू एस, उपप्राचार्य राजे , तानाजीरावजी पाटील तळेगावकर, प्राध्यापक नंदकुमार पटवारी,प्राध्यापक विश्वजीत पाटील, तसेच सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!