देवणी खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त स्वच्छता मोहीम

देवणी खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त स्वच्छता मोहीम

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील देवणी खु. येथील श्री ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे प्रति वर्षाप्रमाणे शुक्रवार दि.२७/०१/२०२३ ते ,०३/०२/२०२३ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथश्रेष्ट ज्ञानेश्वरी पारायण, भावार्थ रामायण, कथामृत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देवणी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या संत‌समागमी नामचिंतनाचा श्रवणलाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा काकडा, ज्ञानेश्वरी पारायण,गाथाभजन, भावार्थ रामायण, ज्ञानयज्ञ सोहळा, हरिपाठ कीर्तन,हरिजागरण, काकडा रुद्र अभिषेक, व्यासपीठ कथाकार ह,भ,प, अभंगराव पाटील, व्यासपीठ ह,भ,प माधव महाराज गरड येणगेवाडीकर,किर्तनकार ह,भ,प राहुल महाजन हाडगा, संतोष पाटील महाराज देगलूरकर, देविदास महाराज निवळीकर, भाऊसाहेब महाराज जाहुर बालकिर्तनकार, मुक्ताई चाळक व शिवानीताई चाळक,अॕड संदिप पाटील महाराज तेलगावकर, युवराज महाराज करक्याळकर, उमाकांत महाराज घाटनंदुर यांचे काल्याचे किर्तन झाल्या नंतर महाप्रसादाचे नियोजन केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन समस्त गावकरी मंडळ देवणी खु. यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!