बोळेगाव येथील अवैध दारू व शिंदी विक्री बंद करण्याची मागणी

बोळेगाव येथील अवैध दारू व शिंदी विक्री बंद करण्याची मागणी

देवणी( रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील बोळेगाव येथील भेसळ युक्त शिंदी व देशी दारू बंद करण्यासाठी दारू विक्रेते यांना विनंती करुन पण दारू बंद करत नसल्यामुळे गावामधे सर्व ग्रामस्थांनी मोर्चा काडून गावातील नागरिकांनी दारू विकणारे यांच्या घरी जाऊन सर्व दारू पकडून देवणी पोलिस स्टेशन यांच्या लक्षात आणुन दिले, व ही दारू विक्री बंद करावी या साठी गावातील स्त्री ग्राम शक्ती महिला ग्राम संघ व नवतरुण मित्र मंडळ बोळेगाव यांच्या वतीने देवणी पोलिस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले. गावातील सर्व माता भगिनी उपस्थित होत्या. गावामध्ये खुप मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आसून गावातील कित्येक माता भगिनिंचे संसार उद्धवस्त होत आहेत, व गावातील तरुण मुलांच भविष्य उध्वस्त होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पोलिस अधिकारी यांना येत्या दोन दिवसात गावातील दारु बंद करावी अन्यथा बोळेगाव मध्ये कायदा सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा पोलीस अधिकारी यांना देण्यात आला आहे. सदरील निवेदन उपनिरीक्षक ‌शेख यांना ‌देण्यात आले. या निवेदनावर माजी सरपंच चिदानंद जाधव, बाळू आंबेवाले, प्रवीण पवार, वैभव म्हेत्रे, संदीप पाटील, राजेश पाटील, राजीव कोकरे, वैभव गायकवाड, मलकु कोरे, परमेश्वर सगर, धनराज गायकवाड, दिपक गायकवाड,समीर शेख, पुष्पक सुर्यवंशी, विक्रम गायकवाड,आकाश कांबळे, आशा कार्यकर्ते छाया गायकवाड, पदमिन गायकवाड, रेणुका भंडे, मंगलबाई कोरे, जयश्री कांबळे,शारुबाई मुस्तापुरे, व गावातील नागरिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!