पोस्ते पोद्दार लर्न स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील पोस्ते पोद्दार लर्न स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रियांकाताई पोस्ते, संस्थेचे सचिव सुरज पोस्ते, प्राचार्य सूर्यकांत चवळे, उपप्राचार्य मुबारक मुल्ला या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वर गोरे (तहसीलदार उदगीर ), सतीश मुंडे (शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख म.उ.महाविद्यालय उदगीर)आणि दीपक कुमार वाघमारे ( पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर)या क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित होते.
या वार्षिक क्रीडा महोत्सवाची सुरुवात सरस्वती पूजन,दीप प्रज्वलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुण्यांतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शाळेतील विद्यार्थ्याच्या चार संघामध्ये विभागणी केली होती. एक्वा हाऊस, इग्निस हाऊस ,टेरा हाऊस, विंटस हाऊस या चार संघांमध्ये मैदानी स्पर्धा लिंबू चमचा ,100 मी., 200 मी. धावणे, (4×100)रिले या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा पार पडल्या.या क्रीडा महोत्सवात प्रथम,द्वितीय,तृतीय खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
या क्रीडा महोत्सवात प्रथम क्रमांक इग्निस हाऊस, द्वितीय क्रमांक टेरा हाऊस, तृतीय क्रमांक विंटस हाऊस या संघाला पारितोषिक देण्यात आले.या क्रीडा महोत्सवाचे सूत्रसंचालन वसंत नेमाने, सौ.किरण चिद्रे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. मंजुषा पाटील यांनी केले. शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.अंजुम मुजावर व क्रीडा विभाग प्रमुख सिकंदर आडे ,क्रीडा शिक्षक सावन जाधव , राहुल चव्हाण तसेच सर्व समन्वयक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी हातभार लावला.
