कुणबी मराठा सेना अहमदपूरच्या वतीने स्मशानभूमी उपलब्ध करुन देण्यासाठी निवेदन
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा समाजाला अहमदपूर येथे जागा उपलब्ध करुन देण्यासाठी कुणबी मराठा सेना अहमदपूरच्या वतीने निवेदन तहसीलदार तहसील कार्यालय अहमदपूर यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अहमदपूरमध्ये रहिवाशी असलेला 25 ते 30 हजार समाज असुन त्यासाठी एकही अधिकृत स्मशान भूमी नाही पण इतर समाजाला या शहरालगत स्मशानभूमी करीता जागा उपलब्ध करुन देण्यात आले आहे कारण अहमदपूर शहरामध्ये मराठा समाज मोठया संख्येत असल्यामुळे स्मशानभूमीची आवश्यकता आहे. तरी मराठा समाजासाठी अहमदपूर शहरालगत स्मशान भूमी करीता जागा उपलब्ध करुन देण्यात यावी असेही निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.
सदरील निवेदनावर कुणबी मराठ सेनेचे तालुकाध्यक्ष रमेश किशनराव जाधव, उपाध्यक्ष बालाजी भगत, सचिव बालाजी जाधव, युवा शहराध्यक्ष गोविंद व्यंकटराव काळे, युवा शहर उपाध्यक्ष गोविंद नागनाथ भुरे, विजय ज्ञानोबा पाटील, सुनिल पाटील लांजीकर, अमरदिप पंढरीनाथ पडोळे, अनिल दिगंबर काळे, माधव मारोती काटे, विजय ज्ञानोबा पाटील, रामदास धोंडीबा जाधव यांच्यासह अनेक सदस्यांच्या सह्या आहेत.