फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांगवी ग्रुप ग्रामपंचायतीच्या ‘ग्रामसभे’चा केला अभ्यास

फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांगवी ग्रुप ग्रामपंचायतीच्या 'ग्रामसभे'चा केला अभ्यास

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार तयार झालेली ग्रामपंचायत ही लोकशाही व्यवस्थेचा पाया मजबूत करणारी प्राथमिक संसद असून या ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो आणि ग्रामसभा कशी असते याचा अभ्यास करण्यासाठी येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाची औचित्य साधून थेट सांगवी सुनेगाव आणि सांगवी तांडा या तीन ग्रुप ग्रामपंचायतीला भेट देऊन होणा-या ग्रामसभेचा अभ्यास केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, पत्रकार व समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाने अल्पावधीत विविध क्षेत्रात प्रगती केली असून विद्यार्थ्यांना गुणवत्तेबरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयाकडून विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यशास्त्र विभागाच्या वतीने विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सांगवी, सांगवी तांडा आणि सुनेगाव या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सांगवी येथील ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झालेल्या ग्रामसभेचा कारभार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी महात्मा फुले महाविद्यालयाचे सहल विभाग व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश चौकटे त्यांचे सहकारी प्रा. दत्तात्रेय चव्हाण यांच्यासह राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी सांगवी- सुनेगाव येथे दाखल झाले. याप्रसंगी ग्रामसेवक फिरोज शेख यांनी विद्यार्थ्यांना ग्रामसभेची माहिती दिली. तसेच सरपंच राजेश कांबळे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधत ग्रामपंचायतचा कारभार ग्रामसभेमार्फत कसा चालतो याची इत्यंभूत माहिती दिली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे सरपंच राजेश कांबळे, ग्रामसेवक फिरोज शेख , अर्जुन राठोड,देवकते ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आकाश कांबळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व उपस्थित जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या अभ्यास सहलीबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. प्रकाश चौकटे, प्रा. दत्तात्रेय चव्हाण, डॉ. सतीश ससाणे, ह. भ.प. डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब, डॉ. अभिजित मोरे, प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. दिगंबर माने, डॉ. सचिन गर्जे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!