केंद्र शासनाच्या इएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

केंद्र शासनाच्या इएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय, गुलबर्गा येथे इएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय, पीजीआयएमएसआर चे डीन व इएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल, इ एस आय सी दंत महाविद्यालय आणि नर्सिंग व पॅरामेडिकल कॉलेज या सर्वांचे मानद प्रमुख डॉ.संतोषराव क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी डॉ.क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनात भारतीय संविधान हे जगातील महान संविधानांपैकी एक आहे आणि आम्हाला 6 मूलभूत अधिकार दिले आहेत परंतु त्याच वेळी आपण आपल्या जबाबदाऱ्याही लक्षात ठेवल्या पाहिजेत. तसेच संस्थेतील आपली भूमिका ओळखून त्याच्याशी जोडले गेले पाहिजे आणि आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. विद्यार्थी या नात्याने शिक्षकांबद्दल आदर बाळगून अभ्यासात प्रामाणिकपणे वक्तशीरपणे वर्गात उपस्थित राहून मित्रांसोबत शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहून स्वतःच्या भविष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपल्या पालकांना आणि संस्थेला अभिमान वाटावा असे कृतत्व दाखवावे.

तसेच डॉ. क्षिरसागर यांनी उत्कृष्टता साध्य करण्यावर आणि सांघिक भावनेच्या महत्त्वावर भर दिला. ईएसआयसी मेडिकल कॉलेज लवकरच सर्व विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम आणि विभाग सुरू करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. ईएसआयसी मेडिकल कॉलेजला उत्कृष्ट संस्था बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ईएसआयसी डेंटल कॉलेजचे डीन डॉ. प्रशांत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इव्होना लोबो, शिक्षक कर्मचारी आणि ईएसआयसी मेडिकल डेंटल पॅरामेडिकल आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!