केंद्रीय प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण

केंद्रीय प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण

वाढवणा बु.(हुकूमत शेख) : वाढवणा बु. येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिना निमित्त पहेली ते चौथी पर्यंतच्या विध्यार्थी, विध्यार्थिनी असलेल्या वर्गातील इच्छुक मुले, मुलींनी कबड्डी, खोखो, लिंबू चमचा, कुर्सी रेस,थैला रेस, बेंडूक उड्या, भाषण स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेत जे विध्यार्थी, विध्यार्थिनीनी सहभाग घेतला होता, त्यातील प्रथम, द्वितीय आलेल्या मुले, मुलींना शाळेतर्फे मुख्याध्यापक व शिक्षकांनी वही,पेन, पट्टी, उजळणी पुस्तक, रजिष्टर अशा प्रकारे मुला, मुलींना लागणारे शिक्षण साहित्य प्रथम, द्वितीय आलेल्या विध्यार्थी, विध्यार्थिनींना शिक्षण साहित्य शालेय समितीचे आजी, माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य, वार्ताहर हुकूमत शेख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कुतूहलचा विषय म्हणजे इयत्ता चौथी वर्गातील विध्यार्थिनी आदिबा हुकूमत शेख ही इंग्रजीतुन प्रजासत्ताक गणतंत्र दिवसाचे भाषण केल्यामुळे सर्व शिक्षणाप्रेमी व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एम.एच.पठाण, माजी अध्यक्ष आय. ए.धावडे, उपाध्यक्ष बी. एन तरवडे व शिक्षक देमगुंडे यांनी नगदी रोख बक्षीस दिले.सर्वजण आदिबा हुकूमत शेख या मुलीचे कौतुक करत होते. या वेळी शाळेतील मुख्याध्यापक जाकीर तांबोळी, शिक्षक धुप्पे, देमगुंडे, वाकळे, गर्जे, सौ. रेणापुरे मॅडम व शाळेतील सर्व विध्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!