परीक्षा पे चर्चा उपक्रमांतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

परीक्षा पे चर्चा उपक्रमांतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

उदगीर(एल.पी.उगीले) : गट साधन केंद्र उदगीरच्या वतीने परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या अंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे पंतप्रधान यांचा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.आणि त्यानंतर तालुकास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. दोन्ही स्पर्धेतील गुणानुक्रमे प्रथम,द्वितीय, व तृतीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना उदगीरचे गटशिक्षणाधिकारी एस के शेख यांच्या हस्ते ट्रॉफी,प्रमाणपत्र, व पुष्पहार देऊन तर उत्तेजनार्थ व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर लालबहादूर शाळेचे उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड,उदगीर जी. प. प्रशालेचे मुख्याध्यापक खाजा शेख,विस्तार अधिकारी व्ही एस सूर्यवंशी,केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे, विषय साधनव्यक्ति डॉ. ज्ञानोबा मुंढे,व्यंकटेश पेद्दावाड, सि जी गायकवाड,एम टी डूबेवार ,एस आर राजुरे,परीक्षक म्हणून बैले व्ही. डी.,गुरुदत्त महामुनी,एकनाथ राऊत,विशाल आदेप्पा हे उपस्थित होते.स्पर्धेच्या व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी नितीन लोहकरे,एस पी सिंदाळकर,सर्व केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती, विशेष शिक्षक आणि गट साधन केंद्र उदगीर येथील सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी केले तर आभार एजाज चौधरी यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!