उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संस्था सचिव प्रदिप बेद्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी रूग्नालयाचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया, सहसचिव प्रा.महेश बसपुरे,लाॅ.उमंग चे अध्यक्ष विवेक जैन,लाॅ.मोरे,दिपक जोशी,योगेश चिद्रेवार,डाॅ.अर्चाना पवार,डाॅ.सलाम बिरादार,प्रवीण जमादार,निकीता भौसले इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उत्कृष्टरित्या कार्य केलेल्या कर्मचाऱ्याचे विश्वस्त मंडळीच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू पवार,प्रस्तावना सुदाम बिरादार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी संजय पाटील व सर्व कर्मचारी वर्ग यांनी कार्य केले.यावेळी रूग्नालयातील सर्व कर्मचारी व पेशन्ट उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!