दापका जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

दापका जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

दापका (एल.पी.उगीले) : कमलनगर तालुक्यातील सरकारी आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा दापका येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक भानुदास वासरे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील शिक्षणतज्ञ विलासराव गुरुजी ,शाळेचे आधारस्तंभ व्यक्तिमत्त्व रमेश पाटील,तर प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका सौ.सुनंदा कोंगे, माध्यमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुशराव वाडीकर,प्राथमिक शाळेचे अध्यक्ष गौस खान व दापका क्षेत्राचे केंद्रप्रमुख व्यंकटराव बिरादार होते .मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक व माध्यमिक शाळेत विध्यार्थ्यांनी आपल्या विविध संस्कृतीक कार्यक्रमाद्वारे आपले सुप्तगुण व प्रतिभा दाखवली. चिमुकल्याच्या कलाविष्काराने परिसर फुलून गेला तर विविध लोकनृत्यानी परिपूर्ण आशा कार्यक्रमाचे पालक वर्ग व परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. बंजारा व जोगवा नृत्यानी कार्यक्रमाची उंची गाठली.कार्यक्रमात मान्यवरांनी विचार व्यक्त केले .प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ञ विलास जाधव गुरुजी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून ,गावाला शाळेचा अभिमान असला पाहिजे ,लहान मूल हे मातीचा गोळा असतात त्यांना आकार देण्याचे काम शिक्षकांनी अतिशय प्रामाणिकपणे केले पाहिजेत. असे सांगून विध्यार्थ्यांचे कौतुक केले .शाळेचे आधारस्तंभ व परिसरातील आदर्श असलेले रमेश पाटील यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यातील सुप्तगुण बाहेर काढून त्यांना परिपूर्ण करण्याचे काम करत आहेत .शाळेला गावाचा आधार पाहिजे, गावाला शाळेचा स्वाभिमान पाहिजे.शाळेची गुणवत्ता सुधारणे हा संकल्प घेऊन आम्ही काम करू. असे सांगून विध्यार्थ्यांनी विविध भाषेत सादर केलेली प्रतिभेचे कौतुक केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष वासरे यांनी शाळेचा विकास हाच आमचा ध्यास, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव बिरादार व सतीश सावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन वसंत विलासपुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवृंद शिवाजी शिगरे ,चैन्वबस्व स्वामी ,मारोतीराव बिरादार, अशोक जाधव, गुणवंत बिरादार, अर्चना शिंदे,राजश्री कदम ,सुवर्णा खंदाडे ,अर्चना सुरशेटवार ,अर्चना रेड्डी,सुप्रिया काळे इत्यादींनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!