गायन परीक्षेत श्रावणी व लक्ष्मीकांत चे उत्तुंग यश

गायन परीक्षेत श्रावणी व लक्ष्मीकांत चे उत्तुंग यश

उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई द्वारा घेण्यात येणाऱ्या डिसेंबर 2022 मध्ये संपन्न झालेल्या संगीत प्रारंभिक गायन परीक्षेमध्ये यशवंत विद्यालयातील इयत्ता सातवीचा विद्यार्थी लक्ष्मीकांत ज्ञानेश्वर जवळे हा 50 पैकी 49 गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे. तसेच इयत्ता आठवीतील श्रावणी ज्ञानेश्वर जवळेही 50 पैकी 48 गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे .या बंधू-भगिनीचे शाळेचे मुख्याध्यापक गंपले व्ही. व्ही, उप मुख्याध्यापक आर. व्ही. कोंडलवाडे,वर्ग शिक्षिका प्रतिभाताई सोलापुरे, संस्कृत अध्यापिका माळी व्ही. व्ही., चित्रकला शिक्षक महादेव खळुरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बालाजी सुवर्णकार, संचालिका छायाताई जोशी, श्याम कुलकर्णी, संगीत मार्गदर्शक गोपाळरावजी जोशी, केदार जोशी यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!