मान्यवरांचा सत्कार करण्याची औटे परिवाराची परंपरा – अभिजीत औटे

मान्यवरांचा सत्कार करण्याची औटे परिवाराची परंपरा - अभिजीत औटे

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर शहरामध्ये जे कोणी मान्यवर कलाकार पाहुणे म्हणून येतात, त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा औटे परिवाराची राहिलेली आहे. कलाकार, नेतेमंडळी, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडाक्षेत्र, कलाक्षेत्र मध्ये नावलौकिक मिळवलेल्या दिग्गजांचा सत्कार करण्यात, गौरव करण्यात आम्ही उदगीरची परंपरा समजतो. असे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अभिजीत औटे यांनी व्यक्त केले. ते जीनियस होम मिनिस्टर मान पैठणीचा सन्मान वहिनीचा या टीमचे राजू परदेशी, सुशांत गुरुजी, यांच्यासह मान्यवर कलाकार मंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच बंसल क्लासेसचे गजानन घुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अभिजीत अशोकराव औटे मित्र मंडळाच्या कार्यालयात सत्कार करताना बोलत होते. उदगीर हे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावाजलेले शहर आहे. पुरोगामी आणि सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ असलेल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर असून देखील आपली आदर्श परंपरा कायम जपणारी ही भूमी आहे. संत, महंतांच्या पावन भूमीत दिग्गजांचा सत्कार करताना निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग उदगीर शहराध्यक्ष म्हणून आपल्याला आनंद होत आहे. असेही उद्गार औटे परिवाराच्यावतीने बोलताना अभिजीत औटे म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या उदगीर शहराध्यक्ष दिपाली औटे याही उपस्थित होत्या.

About The Author

error: Content is protected !!