सरस्वती विद्यालय कुमठा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप उत्साहात

सरस्वती विद्यालय कुमठा येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप उत्साहात

उदगीर (एल.पी.उगीले) : सरस्वती विद्यालय कुमठा बुद्रुक येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक शिंदे जी.आर तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक वाघमारे एम.बी., बुधवारे एम.एस. ,कांबळे यु. आर हे उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जवळे ज्ञानेश्वर हे उपस्थित होते. या प्रसंगी ज्ञानेश्वर जवळे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे महत्त्व सविस्तरपणे विद्यार्थ्यांना सांगितले. शब्दसुमनांनी स्वागत माने ज्ञानेश्वरी व ढाकणे अस्मिता यांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले.या पंधरवड्यात शाळेमध्ये सुंदर हस्ताक्षर ,शुद्धलेखन स्पर्धा संपन्न झाली .यात दुर्गावाड आदित्य प्रथम, कदम साक्षी गणेश द्वितीय ,वाघमारे आयुष द्वितीय तर वाघमारे वैष्णवी चंद्रकांत ही तृतीय आली. पाचवी ते सातवी गटातून राजे आर्या, माने ज्ञानेश्वरी प्रथम, गडमे वेदिका द्वितीय तर पवार शुभम तृतीय आला .मराठी घोषवाक्य स्पर्धेत कदम साक्षी प्रथम, कांबळे स्नेहा द्वितीय, वाघमारे संघर्षा तृतीय आली. माझी मराठी भाषा या विषयावरील निबंध स्पर्धेत माने ज्ञानेश्वरी प्रथम, वाघमारे वैष्णवी द्वितीय तर गोंटे अनुजा तृतीय आली. मराठी स्वरचित काव्य लेखन स्पर्धेत कदम साक्षी प्रथम तर गोंटे अनुजा द्वितीय आली. प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. व यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप शिंदे जी.आर यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढाकणे अस्मिता हिने केले तर आभार प्रदर्शन पाटील केतकी हिने केले.माय मराठी भाषा गौरव गीताने या कार्यक्रमाची सांगता पवार शुभम यांनी केली.

About The Author

error: Content is protected !!