विद्यार्थी आणि कवी समाजभावनांचे टिपकागद – संजीवनी तडेगावकर

विद्यार्थी आणि कवी समाजभावनांचे टिपकागद - संजीवनी तडेगावकर

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उदयोत्सव 2023 चे उद्घाटन सुप्रसिद्ध कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर, जालना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटीया तसेच संस्था सदस्य बसवराज पाटील मलकापूरकर, मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, ललिता पाटील, प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य तथा विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य सी.एम.भद्रे(क.म.)विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी कु.फुलराणी कांबळे, पंडितराव तडेगावकर, विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष रमेशअण्णा आंबरखाने, प्रा.डॉ.एम.बी.स्वामी तसेच सर्व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व महाविद्यालयाची ओळख प्राचार्य संदिकर यांनी करून दिली. उदयगिरीची माती संस्कार रुजवते, असे मत विद्यापीठ प्रतिनिधी फुलराणी कांबळे हिने व्यक्त केले. उद्घाटक यांचा परिचय डॉ.जेवळीकर यांनी करून दिला. डॉ.संजीवनी तडेगावकर उद्घाटनपर भाषणात बोलताना म्हणाल्या, विद्यार्थी आणि कर्मचारी यावर संस्था विकसित होतात, जीवनविषयक अनुभव सांगितले. त्याबरोबर आपल्या उत्कृष्ट कविता सादर केल्या. अध्यक्षीय समारोपात मानकरी यांनी विद्यार्थ्यांना संमेलनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि आनंद घेण्याचे आवाहन केले. सुत्रसंचालन प्रा.डॉ. ए.पी.मोरे ह्यांनी केले तर आभार प्रा.डॉ.आर.के.मस्के ह्यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!