यशवंत विद्यालयाचे चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत भरीव यश

यशवंत विद्यालयाचे चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत भरीव यश

अहमदपूर (गोविंद काळे) : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अहमदपूर तर्फे आयोजित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांने भरीव यश संपादन केले आहे. या स्पर्धेत यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांने चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एक हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र विवेक मधुकर धडे यांनी पटकावला तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अडीच हजार रुपये रोख,सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र स्वप्निल सखाराम वाघमारे या विद्यार्थ्यांने पटकावला आहे.

या सार्वजनिक जयंती महोत्सव स्पर्धेतील सायकल मँरेथाॕन,चित्रकला व रंगभरण स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांने सहभाग नोंदविला होता.वरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मराठी विभाग प्रमुख रामलिंग तत्तापुरे व कलाध्यापक महादेव खळुरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. वरील यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर सचिव शिक्षण महर्षी डी. बी. लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक व्ही.व्ही.गंपले,उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले,दिलीप गुळवे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!