सामाजिक कार्यकर्ते सहदेव व्होनाळे यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील धानोरा (बु ) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष सहदेव व्होनाळे यांनी नकताच उदगीर येथे आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे संयोजक रंगा राचुरे यांच्या उपस्थित आम आदमी पार्टीत प्रवेश केला असुन सहदेव व्होनाळे यांनी पंचायत समिती अहमदपूर येथे अनेक वर्ष स्वच्छता दुत तसेच वंचित बहुजन आघाडीत तालुका अध्यक्ष म्हणुन काम केले असल्यामुळे त्यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे याचा निश्चित फायदा तालुक्यात पक्षवाढीसाठी होणार असल्याचे मत आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील यांनी पोलीस फ्लॅश न्युजशी बोलताना व्यक्त केले. आपचे जिल्हा संघटक बाबुराव जंगापल्ले, ता. सचिव सुधाकर चोले , ता.उपाध्यक्ष बिलाल शेख, आरूप पाटील आदींनी सहदेव व्होनाळे यांचे पक्षात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले.
