ज्ञानेश्वर जवळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
उदगीर /प्रतिनिधी : निडेबन तालुका उदगीर येथील रहिवासी आणि कुमठा बुद्रुक येथील सरस्वती विद्यालयातील मराठी विषयाचे तज्ञ अध्यापक ज्ञानेश्वर रामराव जवळे यांना रंगकर्मी प्रतिष्ठान चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देऊन माजी राज्यमंत्री आ. संजयजी बनसोडे, सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले ,विशेष आकर्षण म्हणून तानाजी द वॉरियर्स फेम अभिनेते कैलास वाघमारे, आरोग्य दूत नामदेव कदम यांच्या हस्ते आदर्श राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड,सचिव प्रा. ज्योती मदे, उपाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी ,न.प सदस्य दत्ता पाटील, चित्रपट महामंडळाचे सदस्य दत्ताभाऊ जवळगे,श्री जयदीप सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव एन.आर जवळे यांची यावेळी उपस्थिती होती. ज्ञानेश्वर जवळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष अशोक रावजी सांगवीकर, सचिव डी.बी लोहारे गुरुजी, शाळेचे मुख्याध्यापक शिंदे जी.आर, पर्यवेक्षक वाघमारे एम.बी, कलाशिक्षक हलकांचे डी.डी, वरिष्ठ लिपिक माने जे.व्ही, प्रा. पटवारी बी.एस, कांबळे यु.आर, पुठ्ठेवाड व्ही.जी, राठोड ए.पी यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
