साक्षी कदम राज्यात सर्वप्रथम.
उदगीर (प्रतिनिधी) : सरस्वती विद्यालय कुमठा बुद्रुक येथील इयत्ता दहावी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. साक्षी गणेश कदम ही रंगकर्मी प्रतिष्ठान उदगीर तर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सर्वप्रथम आली आहे.
तिचा या निमित्ताने माजी राज्यमंत्री आ. संजयजी बनसोडे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले,चित्रपट अभिनेते कैलास वाघमारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.तिच्या घवघवीत यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिंदे जी.आर, पर्यवेक्षक वाघमारे एम.बी,मार्गदर्शक शिक्षक ज्ञानेश्वर जवळे,कांबळे यु.आर,चित्रकला शिक्षक हलकंचे डी.डी,वरिष्ठ लिपिक माने जे.व्ही,प्रा.पटवारी बी.एस, वर्गशिक्षक राऊत एस.के,पुठ्ठेवाड व्ही.जी,राठोड ए.पी ,ग्रंथपाल नीला आर.एस यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
