शिवाजी महाविद्यालयात हुतात्मा दिन साजरा

शिवाजी महाविद्यालयात हुतात्मा दिन साजरा

उदगीर – महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले, त्यांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी सोमवार दिनांक 30 जानेवारी 2023 सकाळी ठीक अकरा वाजता दोन मिनिटे मौन बाळगून हा दिन हुतात्मा दिन म्हणून शिवाजी महाविद्यालयात पाळण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही आर भोसले यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती कार्यकारिणी सदस्य बबन जाधव यांची होती तर यावेळी उपप्राचार्य डॉ.आर एम मांजरे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ ए एम नवले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जयंती समिती प्रमुख तथा मुख्य कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना डॉ सुरेश शिंदे यांनी केले.सेवक नारायण हराळे, महसूल विभागातील कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!